शेअर बाजार वर जात असल्याने म्युच्युअलफंडात गुंतवणूक करण्याची ही वेळ योग्य आहे का, अशी विचारणा अनेक नवे गुंतवणूकदार करत आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूकबाजार खाली असताना करणे, हे योग्य आहे.
मात्र बाजार केव्हा खाली येईल, याची वाट पाहण्यापेक्षा दर महिन्याला आपल्या क्षमतेनुसार विशिष्ट रक्कम म्युच्युअल फंडात गुंतविणे, हाच खरा मार्ग आहे. ज्याला एसआयपी म्हणतात. एकदाच सर्व रक्कम गुंतविण्यापेक्षा दर महिन्याला रक्कम गुंतवीत रहाणे, केंव्हाही चांगले. याचा फायदा असा की बाजार खाली गेला तर जास्त युनिट मिळत राहतात.
(एनव्ही कमी असते.) तर बाजार वर गेला तर त्याचा फायदा मिळत रहातो. पण बाजार कधी खाली येईल आणि कधी वर जाईल, हे कोणीच सांगू शकत नसल्याने एसआयपी हा शेअर बाजारात गुंतवणुकीचा सर्वात चांगला मार्ग मानतात. त्यामुळे सध्या बाजार वर जातो आहे, म्हणून अशी गुंतवणूक लांबणीवर टाकण्याचे काही कारण नाही.