Pune Crime | रिक्षा हळू चालवा म्हणल्याच्या रागातून दगडाने मारहाण; गुन्हा दाखल

पुणे ,दि.11 – रिक्षा हळू चालवा म्हणल्याच्या रागातून रिक्षा चालकाने दुचाकीला रिक्षा आडवी लावून शिवीगाळ करून दोघांना दगडांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच दुचाकीवर देखील दगड मारून दुचाकीचे नुकसान केले. हा प्रकार काळेपडळ येथील अहिल्यादेवी होळकर चौक येथे घडला. याप्रकरणी चौघांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर राघोजी, विशाल जगधने आणि त्यांचे दोन साथीदार (रा. काळेपडळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबात अविनाश दत्तु साखरे (24, रा. सय्यदनगर, हडपसर,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी पावणे सहा वाजण्याच्या सुमारस फिर्यादी साखरे आणि त्यांचा मित्र यश भोंडे हे दुचाकीवरून चालले असताना रिक्षा चालकाला ते रिक्षा जरा हळू चालवा म्हणले असता, आरोपींनी त्यांच्या दुचकीला रिक्षा आडवी घालून त्यांना दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.