दिल्लीजवळ रेव्ह पार्टी उधळली

नवी दिल्ली – दिल्लीतील उत्पादन शुल्क विभाग आणि दिल्ली पोलिसांनी मिळून केलेल्या संयुक्‍त कारवाईमध्ये छत्तरपूरमध्ये सुरू असलेली एक रेव्ह पार्टी उधळण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी संध्याकाळी

ही कारवाई करण्यात आली. एका फॅशन डिजाईन कंपनीच्या मोठ्या हॉलमध्येच ही रेव्ह पार्टी सुरू होती. या ठिकाणी घातलेल्या छाप्यामध्ये विविध मद्याच्या तब्बल 90 बाटल्या, 5.43 लाख रुपये रोख आणि अमली पदार्थांच्या 38 गोळ्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय कोकेनचा काही साठाही सापडला आहे. याशिवाय बंदी घालण्यात आलेल्या औषधांच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या रेव्ह पार्टीसाठी अयोजकांकडून प्रत्येकी 500 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते.

या रेव्ह पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांनीही मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाले होते. रेव्ह पर्टीमधील बहुतेकजण गुरुगाव, फरिदाबाद, नोएडा आणि उत्तर प्रदेशातील युवक होते. या रेव्ह पार्टीचा मुख्य संयोजक असलेल्या पुलकित याच्याकडे मर्यादित प्रमाणात मद्यपुरवठा करण्याचा परवाना होता. मात्र मद्याच्य एकूण 300 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हरियाणामध्ये विक्रीसाठी आणलेले मद्यही येथे वितरीत केले जात होते. पोलिसांनी या रेव्ह पार्टीच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.