परतीच्या पावसामुळे भातकापणी रखडली

पवनानगर  (वार्ताहर) –मावळ तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भात कापणी रखडली आहे.

काही दिवसांपूर्वी उन्हामुळे काही शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली होती. परतीच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी भात कापणी केली होती. मात्र हा पाऊस पडल्यामुळे पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ या भागात शेतकऱ्यांची भात शेतीचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील भातपीक वाया गेले आहे.

मावळ भागातील काही भागात भातपीक आडवी पडली आहेत. भातखाचरांमध्ये पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांला भात कापताही येत नाही त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या पावसामुळे दाणेही ढासळत आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.