मलेशियात पोलिओचा रुग्ण

27 वर्षानंतर रुग्ण आढळल्याने खळबळ
कौललांपूर : मलेशियामध्ये 27 वर्षांनंतर प्रथम पोलिओचा रुग्ण आढळला. बोरनिओ बेटावर एका तीन महिन्याच्या मुलीला पोलिोची लागण झाल्याचे आढळून आले.

मलेशियाचे आरोग्य महासंचालक नूर हसन अब्दुल्ला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पुर्वेकडील सबह राज्यातील तौरान येथील ही मुलगी ताप आणि अशक्तपणामुळे अतिदक्षता विभगात दाखल आहे. तिच्यावर एका स्वतंत्र वॉर्डात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थीर असून श्‍वासोश्‍वासाला तिला त्रास होत आहे. तिला पोलिओ झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले.

पोलिओ हा संसर्गजन्य विषाणूजन्य आजार असून ते बरा होत नाही. त्याच्यापसून केवळ तोंडावाटे अथवा लशीद्वारे वाचवता येऊ शकते. त्याचा परिणाम पाठीच्या मणक्‍यावर आणि मज्जासंस्थेवर होतो. काही अपवादात्मक परिस्थितीत प्राणावरही बेतू शकते. गेल्या वर्षभरात संपूर्ण जगात पोलिओचे 33 रुग्ण आढळले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

मलेशियाला 2000 मध्ये पोलिओमुक्‍त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तेथे यापुर्वी 1992मध्ये पोलिओचा अखेरचा रुग्ण आढळला होता. या बालकाला बाधा झालेल्या विषाणूचे साम्य फिलिपाईन्स येथे आढळेल्या विषाणूशी असल्याचे नूर हसन यांनी सांगितले. हा रुग्ण आढळणे हे हिमनगाचे टोक असू शकते. याहून अधिक संख्येने पोलिओची बाधा होण्याची भीती सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ जयाबालन यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.