शिरूर शहरातील कॉलेज शंभर नंबरी

शिरूर : शिरूर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, विद्याधाम प्रशाला ,चांदमल ताराचंद बोरा कॉलेज, सूर्यकांत पलांडे जुनियर कॉलेज या सर्व कॉलेजांमधील विज्ञान विभागाचा निकाल 100% लागला असल्याने शिरूर शहरातील इतर तिन्ही कॉलेज शंभर नंबरी निघाले आहेत.

शिरूर विद्याधाम प्रशाला येथील शाळेचा निकाल विज्ञान विभाग 100% तर एमसीव्हीसीसी चा निकाल टक्के लागला आहे. विज्ञान विभाग प्रथम क्रमांक अक्षय हिरवे  91. 85, द्वितीय सायली कोकाटे 90. 92, तृतीय क्रमांक सुरज दिवटे 90.46, चतुर्थ गायत्री कुटे 89.54,पाचवा क्रमांक मोनिका पागिरे 89.23 विद्याधाम प्रशाला गणित विषयात 100 पैकी 100 गुण सायली कोकाटे व पंकज शिंदे यांनी मिळवले आहे. जीवशास्त्र विषयातील मृदुला तळेकर हिने 99 गुण मिळवले आहे, भौतिकशास्त्र विषयात पंकज शिंदे 99 गुण, रसायन शास्त्र अक्षय हिरवे 98, इलेक्ट्रॉनिक्स सुरत दिवटे 191,

एमसीव्हिसी प्रथम क्रमांक शुभम शिंदे 80.66 त्यांनी यश मिळवले आहे . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा, उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, विश्वस्त सी एस बाफना, सचिव तू. म.परदेशी, सह सचिव बाबासाहेब चोरमले, मुख्याध्यापक अनिल तांबोळी यांनी अभिनंदन केले आहे. जी

शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा बारावी सायन्स चा निकाल शंभर टक्के, कॉमर्स 97 .67 टक्के तर एमसीव्हीसी 88.33 टक्के लागला असल्याची माहिती न्यू इंग्लिश स्कूल शिरूर चे मुख्याध्यापक ए ए डोंगरे यांनी सांगितले. विज्ञान विभाग प्रथम सुधीर चौरसिया 68.45 टक्के, द्वितीय क्रमांक निकिता शिंदे 64.4 टक्के, तृतीय क्रमांक साबीरअली अन्सारी 64 टक्के मार्क मिळवले आहेत. कॉमर्स प्रथम मानसी शक्करवार  81.7 टक्के, द्वितीय अमरजीत कांबळे 78.61, तृतीय दीक्षा लंके 74.46, एमसीव्हिसी प्रथम रोहन बनसोडे 76.61, द्वितीय ज्योती देवादिगा 72.92, तृतीय अभिषेक फरगडे 72.46

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे सदस्य जाकीरखान पठाण, न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे ए. ए.डोंगरे यांनी अभिनंदन केले आहे. येथील चांदमल ताराचंद बोरा  महाविद्यालयचा  इयत्ता बारावीचा शास्त्र विभागाचा निकाल १००% लागला आहे.

त्याचबरोबर इयत्ता बारावीचा कॉमर्स विभागाचा ९५.०९%  तर आर्टस विभागाचा ८५.०२% आणि व्होकेशनल विभागाचा ८०.७६% निकाल लागला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष प्रकाश भाऊ धारिवाल, प्राचार्य डॉ के सी मोहिते व महाविद्यालयाच्या  कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डी. के. मांडलिक यांनी अभिनंदन केले आहे.

विठ्ठलनगर येथील सूर्यकांत पलांडे ज्युनियर कॉलेज चा सायन्स विभागाचा निकाल 100% लागला आहे. कॉलेजचा सायन्स विभागाचा १००% तर वाणिज्य विभागाचा ९७.८७%  व आर्ट विभागाचा ९१.६५% निकाल लागला आहे. सायन्स विभागाचा सलग ५ व्या वर्षी १००% निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार काकासाहेब पलांडे व कॉलेजच्या प्राचार्या अंजली गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.