पुणे – करोना काळात बांधकाम क्षेत्रात मोठे शैथिल्य आले होते. बांधकाम क्षेत्र पुन्हा भरारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीही प्रयत्न करत आहे. असे असतानाच बसील श्रीजी प्रकल्पाला अल्पावधीत मिळत असलेला प्रतिसाद बांधकाम क्षेत्राला पुन्हा तेजी आल्याचे दर्शवत असल्याचे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
बसील श्रीजी या गृह प्रकल्पाचा शुभारंभ खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार चेतन तुपे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, सुरेश घुले, रणजीत शिवतरे, माजी महापौर दत्ता धनकवडे. नगरसेवक युवराज बेलदरे, संगीता कोंढरे, निलेश मगर, सुधीर कोंढरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पाचे भागिदार गोपाळ वर्मा, निलेश घुले, विशाल सोनी, उल्हास दारवटकर, रोशन वर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
बसील ग्रुप शेतकरी, व्यापारी, सहकार आणी पतसंस्था क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला जे योग्य पाहिजे ते हा ग्रुप देत आहे. या ग्रुपचा हा परिसरातील तीसरा प्रकल्प आहे. अल्पावधितच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही कौतुकास्पद भरारी आहे. ग्राहकांचा विश्वास आणी दर्जा राखल्यानेच हे होऊ शकले. हा दर्जा बसील ग्रुप पुढे ही देत राहिल आणी यामुळे अनेकांची घरांची स्वप्न पुर्ण होती.
बसील ग्रुपचे संचालक उल्हास दारवटकर यांनी गृहप्रकल्पाबद्दल सांगितले की, बसील ग्रुपतर्फे शहरात विविध ठिकाणी दर्जेदार गृहप्रकल्प साकारले गेले आहेत. सध्या बसील श्रीजी हा प्रकल्प साकारला जात आहे. यामधील 107 पैकी 35 टक्के सदनिकांचे बुकिंग झाले आहे. विविध प्रकारच्या ऍमिनिटीज आणी वाजवी दर हे प्रकल्पाचे वैशिष्टय आहे.
सध्या बांधकाम व्यवसायाला अतिशय बदनाम केले जात आहे. मात्र शहरात अनेक बांधकाम व्यवसायीक वाजवी दरात चांगल्या सुविधा देत आहेत. त्याला हवी तशी प्रसिध्दी मिळत नाही. बसील ग्रुपतर्फे बसील श्रीजी प्रकल्पात अतिशय कमी किमंतीत दर्जेदार ऍमिनिटीज उपलब्ध करुन दिल्या गेल्या आहेत. यामुळे गृहप्रकल्पाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बसील श्रीजी हा प्रकल्प नऱ्हे-आंबेगाव रस्त्यावर दत्तनगर चौकात साकारत आहे. यामध्ये टेरेसवरही काही महत्वाच्या ऍमिनिटीज देण्यात आल्या आहे. योगा आणी पार्टीसाठी स्वतंत्र जागा, क्लब हाऊन, किडस झोन, जिमनॅशिअम आणी मंदिर अशा सुविधाही ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरणाऱ्या आहेत. प्रकल्पाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून व्यवसायीक गाळे होतोहात विकले गेले आहेत.