कामशेत – दहावीचा निकाल जाहीर होताच शहरातील पंडित नेहरू विद्यालय, सुमन रमेश तुलसियांनी इंटरनॅशनल स्कूल, महर्षी कर्वे आश्रम शाळा, जैन इंग्लिश स्कूल, तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी व पालक मंडळी यांची मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी लगबग सुरू होती.
कामशेतमधील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयात दहावीच्या बोर्ड परीक्षेत एकूण 259 विद्यार्थी व विद्यार्थिनीनी दिली होती. त्यातील 252 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.29 टक्के लागला आहे, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. ई. शेंडे यांनी दिली. प्रियांका शामकांत साळवे हिने 469 गुण मिळवले. विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयात 100 गुण मिळाले आहेत. ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. द्वितीय प्रीती नवनाथ लालगुडे 90.60 टक्के, तर तृतीय क्रमांक संकेत सबाजी काजळे याने 89.00 टक्के मिळाले आहे.
खामशेत मधील सुमन रमेश तुलसियानी स्कूलचा निकाल 98.18 टक्के निकाल लागला आहे. शाळेचे एकूण 55 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. शाळेतील दीक्षा कैलास केदारी हिने 88.80 टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. तर सानिका रवींद्र दीक्षित हिने 87.60 टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळावला. कल्याणी गणेश गरुड हिने 86.80 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता देवरे यांनी दिली. या विद्यालयातील प्रथम क्रमांक अश्विनी मोहिते 92.20 टक्के दुसरा क्रमांक अंजली काळे हिला 92.00 टक्के मिळाले आहे. तृतीय क्रमांक विद्या दगडे 90.00 टक्के मिळाले.
कामशेत मधील जैन इंग्लिश स्कूल शाळेचा निकाल 100 टक्के लागला. या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका तनुश्री शर्मा, ट्रस्टी व सर्व शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. दहावीची परीक्षेला शाळेतील एकूण 41 विद्यार्थी सामोरे गेले. प्रथम क्रमांक – समृद्धी गणेश आंद्रे 88.80 टक्के, द्वितीय क्रमांक मारिया सैफी कामशेतवाला 86.80 टक्के आणि तृतीय क्रमांक ऋतुजा शंकर टेमघरे 86.60 टक्के.
नाणे मावळातील करंजगाव येथील गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालय या शाळेमधून 91 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा या वर्षीचा निकाल 95.60 टक्के लागला आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक बापूराव नवले यांनी दिली. विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थी प्रथम क्रमांक – ओंकार भुंडे 94.80 टक्के असून, ओंकारने गणित विषयात 100 गुण मिळविले आहेत. द्वितीय क्रमांक प्रथमेश गायकवाड 92.80 टक्के आणि तृतीय क्रमांक अक्षय भांगरे 90.00 टक्के. सांगिशे येथील कै. उषाताई लोखंडे चॅरिटेबल ट्रस्ट शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून, यंदा 20 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. शाळेत आदित्य गुलाब जाधव याने 82.80 टक्के, ओंकार बाळू टाकळकर याने 76.40 टक्के, नम्रता शिवाजी कुटे हिने 73.60 टक्के मिळवत अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.
शिवणे गावातील श्री संत तुकाराम महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यावर्षी 60 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दिनेश माधव अडकीने याने 93.20 टक्के, तनुजा चंद्रकांत चांदेकर 92.60 टक्के, आकांश जयवंत टिळे 91.60 टक्के मिळवत अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.