भंडारदरा धरण निम्मे भरले 

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

अकोले – अकोले तालुक्‍यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व अन्यत्र वरुणराजाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाचा साठा सव्वा पाच टीएमसी झाला आहे. तर निळवंडे, आढळा, मुळा या धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.

आज सकाळी भंडारदरा धरणात पाच हजार 266 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झालेला होता. आतापर्यंत धरणात चार हजार 966 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. तर निळवंडे धरणामध्ये आज सकाळी 1796 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता.

या धरणात आतापर्यंत 1540 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे.तर आढळा धरणामध्ये आज सकाळी 166 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. तर आतापर्यंत या भागामध्ये 81 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. मुळा नदी पात्रात 5630 क्‍युसेक विसर्ग नदीपात्रातून वाहत आहे. या धरणात आज सकाळी 8416 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे. जायकवाडी धरणामध्ये 18 टीएमसी पाणीसाठा कायम आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाची झालेली नोंद मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : घाटघर- भंडारदरा-77, आढळा-10, अकोले-18, कोतूळ-16.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.