नवी दिल्ली – रिजर्व्ह बँकेने आज रेपो रेट जाहीर केले आहेत. मात्र, रिजर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थेच ठेवले आहेत. यामुळे रेपो रेट ५.१५ % तर रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्के कायम आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
Repo rate remains unchanged at 5.15%, reverse repo rate is at 4.90% and bank rate is 5.40%. pic.twitter.com/MtoiJs0jX6
— ANI (@ANI) December 5, 2019
अर्थव्यवस्थाही सध्या रुसलेली असल्याने परिस्थितीला सामोरे जात मार्ग काढण्याची गरज आहे. पुन्हा व्याज दरातील कपातीने बांधकाम क्षेत्रात नवचैतन्य परतण्याची अपेक्षा होती. मात्र, रिजर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थेच ठेवल्याने बाजारात निराशाचे वातावरण राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने वित्तीय वर्ष २०१९-२०२०मधील जीडीपीचा अंदाज ६.१ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
Monetary Policy Committee has decreased GDP projection from 6.1% to 5% for 2019-20 https://t.co/vNelqlxYG1
— ANI (@ANI) December 5, 2019
रेपो रेट म्हणजे काय ?
सार्वजनिक बँका आपल्या कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी रिजर्व्ह बँकेकडून पैसे घेते, त्या पैशांवर रिजर्व्ह बँकेकडून जो दर आकारला जातो त्यास रेपो रेट असे म्हणतात.
Reserve Bank of India (RBI) Governor Shaktikanta Das: As regards the external sector, exports contracted in September-October 2019 reflecting the persisting weakness in global trade but non-oil export growth returned to positive territory in October, after a gap of 2 months. pic.twitter.com/7gAQXItLWm
— ANI (@ANI) December 5, 2019