बेल्हे : राजुरी (ता.जुन्नर) गावात मंगळवारी चार संशयित रुग्ण आढळून आले होते. तपासणीसाठी या चौघांचे स्वॅब मंगळवारी घेण्यात आले होते. त्या चौघांचा रिपोर्ट आज मिळाला असून निगेटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. परीक्षित टाके यांनी दिली. या मध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश होता.
गावात संशयित रुग्ण आढळून आल्याने जुन्नर चे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी गाव बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले होते. तरीही पुढील सूचना येईपर्यंत गाव बंद असणार आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीने अत्यावश्यक कामाशिवाय गावाबाहेर पडू नये तसेच शासकीय नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन गावचे सरपंच एम.डी. घंगाळे यांनी केले आहे.