बारामती(प्रतिनिधी) – येथील दूध संघ वसाहतीतील एका तरुणाच करोना चाचणीचा मंगळवारी (दि. 26) रात्री आलेले अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर बुधवारी (दि. 27) सकाळी आलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बारामतीत पॉझिटिव्ह आलेल्या दूध संघ वसाहतीतील रुग्णाची दुसरी चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. तो दिलासा असला तरी प्रत्यक्षात कोणताही प्रवास किंवा कोणताही थेट संपर्क नसताना कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खुल्याने फिरत असलेल्या बारामतीकरांसाठी हा धडा आहे. दूध संघ वसाहतीतील 29 वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाने मंगळवारी रात्री जाहीर केले होते. मात्र शनिवारी केलेल्या चाचणीचा अहवाल मंगळवारी आला. त्याचबरोबर मंगळवारी केलेल्या चाचणीचा अहवाल आज सकाळी मात्र निगेटिव्ह आलेला आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी माहिती दिली.
या तरुणाचा करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याचा कोणताही प्रवास संदर्भ नसल्याने बारामतीकरांनी याची काळजी घेण्याची गरज आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलने करवून घेतलेल्या चाचणीमध्ये काही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, याच तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या तरुणास कोणतीही लक्षणे नव्हते. त्यामुळे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनास धक्का बसला होता. अर्थात अहवाल येण्यास उशीर होत असल्याने प्रशासनाने त्याची मंगळवारी पुन्हा चाचणी केली. त्याचा अहवाल सकाळी निगेटिव्ह आली. त्यामुळे रात्री पॉझिटिव्ह आलेला तरुण आता निगेटिव्ह आहे. त्यामुळे एका अर्थाने तो बारामतीकरांसाठी दिलासाच आहे.