मंचर – चिंचोली (कोकण्यांची, ता. आंबेगाव) येथील करोनाबाधित 75 वर्षीय वृध्दाचा बुधवारी (दि. 24) मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या 37 वर्षीय मुलाचाही रिपोर्टही करोना पॉझिटिव्ह आला आहे, तसेच मंचर येथील 65 वर्षीय व्यक्तीही बाधित असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी गुरुवारी (दि. 25) दिली.
मंचरमध्ये 65 वर्षीय व्यक्ती करोनाबाधित आढळला आहे. सध्या तालुक्यात 51 बाधितांपैकी 42 रुग्ण बरे झाले, असून दोन मयत आहे, तर 7 रुग्णांवर भीमाशंकर हॉस्पिटल मंचर व पुणे रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
चिंचोली (कोकण्यांची) येथील वृद्धाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट (दि. 20) आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या. बाधिताच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन केले.
आरोग्य तपासणी, जंतुनाशक फवारणी केली; परंतु बुधवारी संबंधित बाधित वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांनतर त्याच्या मुलाचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.