जुन्नर तालुक्यात अकरा करोनाबाधित
जुन्नर (प्रतिनिधी) – सावरगाव (ता. जुन्नर) येथे आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आलेल्या इतर चौघांची चाचणी पॉजिटिव्ह आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुक्यात करोनाबधितांची संख्या ७ वरून ११ वर गेली आहे. या अकरापैकी एक रुग्ण बरा झाला असून दहाजण अॅक्टिव्ह आहेत.
त्यामुळे सावरगाव हा हॉटस्पॉट बनत असून येथे सहाजण करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. सावरगाव, धोलवड व मांजरवाडी गावांचा परिसर संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे.