जुन्नरमधील 35 संशयितांचा रिपोर्ट निगेटिव्ह

जुन्नर -लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील कोविड केअर सेंटरमधून पाठविण्यात आलेले 35 जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आल्याची दिलासादायक बातमी आहे. तालुक्‍यात गेल्या तीन दिवसांत एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.

तालुक्‍यात एकूण दहा प्रतिबंधित क्षेत्रे असून येथे सुमारे 4300 कुटुंब राहत आहेत. एकूण 22 रुग्णांपैकी तीन बरे झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. मंगळवार (दि. 2) अखेर तालुक्‍यातील 18 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.