पुणे -पावसाचा जोर ओसरला असला तरी खबरदारी म्हणून अद्यापही काही धरणांमधून विसर्ग सुरू ठेवण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक मुळशी धरणातून 5 हजार क्युसेक तर त्या खालोखाल खडकवासलातून 3 हजार 424 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात असणारी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला तरी धरणातून पाणी सोडवे लागत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी पश्चिम पट्ट्यातील घाट माथ्यावर अद्याप सरी कोसळत आहेत. हे सर्व पाणी धरणांमध्ये येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सध्या काही धरणातून विसर्ग सुरू ठेवण्यात येत आहे.खडकवासला धरणाबरोबर पानशेत, वरसगाव, चासकमान, निरा-देवधर, वीर, डिंभे, घोड, भामा आसखेड या धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.