“जबरीया जोडी’ची रिलीज डेट पुन्हा बदलली

सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणिती चोप्राच्या मुख्य भूमिका असलेल्य “जबरीया जोडी’ची रिलीजची तारीख यापूर्वी काहीवेळा बदलून झाली आहे. आता पुन्हा एकदा या सिनेमाचा रिलीज आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. हा सिनेमा 2 ऑगस्टला रिलीज करायचे असे आगोदर ठरले होते. मात्र आता या सिनेमाला 9 ऑगस्टला रिलीज करण्याचे ठरले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणिती चोप्रा दोघेही सध्या “जबरिया जोडी’च्या प्रमोशनमध्ये खूप बिझी आहेत. “की होंदा प्यार’, “ढुंढे अखियां’, “खडके ग्लासी’ आणि “जिल्हे हिलेला’ यासारख्या गाण्यांनी यापूर्वीच पब्लिकची पसंती मिळवली आहे. बिहारमध्ये प्रचलित असलेल्या “पकडवा विवाह’या विचित्र विवाह प्रथेची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. मुलाच्या घरचे मिळून नवऱ्या मुलीचे अपहरण करून तिचे लग्न लावून देतात.

परिणिती यापूर्वी “केसरी’मध्ये अक्षय कुमारबरोबर दिसली होती. ती आता “संदीप और पिंकी फरार’मध्ये अर्जुन कपूरबरोबर दिसणार आहे. याशिवाय बॅडमिंटन क्‍वीन साईना नेहवालचा बायोपिक, “भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ आणि “द गर्ल ऑन द ट्रेन’च्या हिंदी रिमेकमध्येही ती काम करते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.