“द बॅटमॅन’ या हॉलीवूड चित्रपटासाठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता हा चित्रपट 1 ऑक्टोबर 2021ला प्रदिर्शत होणार नाही. या चित्रपटाची रीलीज डेट बदलण्यात आली आहे. यात “ट्वीलाइट’ फेम अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन हा बॅटमॅनची भूमिका साकारत आहे.
“द बॅटमॅन’ हा चित्रपट 4 मार्च 2022मध्ये रिलीज करण्यात येणार आहे. करोना व्हायरसमुळे शूटिंग रखडल्याने चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
या चित्रपटात चाहत्यांना भरपूर ऍक्शन आणि बॅटमॅन हा बदला घेताना दिसणार आहे. मॅट रीव्सद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात रॉबर्ट पॅटिन्सनशिवाय क्रेविटज, पॉल डानो, कोलिन फॅरेल आणि जेफ्री राइट झळकणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना आतापासून उत्सुकता निर्माण झाली आहे.