यंदाच्या वर्षातील बहुचर्चित “ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत मोठा घोळ आहे. कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्याची तारीख पुढे ढकलली जात आहे. बरं, आता चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यात आली असून त्याची घोषण करण्यात आली आहे. हा चित्रपट वर्षाअखेर 4 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्टने इंस्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतच याबाबत घोषणा करण्यात आली आहे. रिलीजच्या तारखेला रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी अगदी वेगळ्या प्रकारे याची घोषणा केली आहे.
या व्हिडिओमध्ये रणबीर दिग्दर्शक अयानवर रागवत हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार असा विचारतो. तसेच दोन वर्षांपासून तु काय करीत आहात असेही कुटूंबातील सदस्यही विचारत आहेत, असे रणबीर म्हणतो.
रणबीरच्या नाराजीवर अयान म्हणतो, आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यासाठी वेळ लागतो. अयानने कबूल केले की, या चित्रपटासाठी इतका वेळ होईल असे वाटले नाही.दरम्यान, हा चित्रपट येत्या 4 डिसेंबरला येत आहे, असे सांगतो.
यावर अमिताभ बच्चन पुन्हा एकदा या तारखेबाबत विचारतो. त्याचवेळी व्हिडिओ बनवणारी आलिया आपल्या बाजूला कॅमेरा फिरवून आपला आनंद व्यक्त करते. यासह हा व्हिडिओ समाप्त होतो. दरम्यान, आता चाहत्यांची प्रतीक्षाही संपली असून “ब्रह्मास्त्र’ चित्रपट 4 डिसेंबर रोजी येणार आहे.