सिसी यांची अध्यक्षीय मुदत वाढवण्यासाठी इजिप्तमध्ये सार्वमत

कैरो, (इजिप्त) – इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्तह अल सिसी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यासाठी आज देशभरात सार्वमत घेण्यात आले. इजिप्तमध्ये राजकीय स्थिरता आणण्यासाठी एका अध्यक्षाला अधिक कार्यकाळ मिळण्याची गरज आहे, असे कारण देऊन सिसी यांनी हे सार्वमत घेतले आहे. सिसी यांच्या सार्वमताद्वारे स्वतःचे अधिकार समर्थ करण्याच्या या निर्णयाविरोधात इजिप्तमध्ये तीन दिवसांसाठी हे मतदान चालणार आहे. यातून राज्यघटनेत मोठे फेरबदल केले जाणार होऊन सिसी यांचा कार्यकाळ 2024 पर्यंत वाढवला जाणार आहे.
याशिवाय इजिप्तमधील राजकारणात सिसी यांना विशेषाधिकार प्राप्त होनार आहेत. देशातील न्यायपालिका आणि लष्करी अधिकारही सिसी यांना मिळणार आहेत. सिसी यांनी लष्करावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी या सार्वमताचा आधार घेतला आहे.

इजिप्तमधील लहानमोठ्या अरबविरोधी गटांच्या कारवायांना नेस्तनाबुत करण्यासाठी सिसी यांनी आपले अधिकार वाढवण्याचे ठरवले आहे. 2011 साली तत्कालिन अध्यक्ष होस्नी मुबारक यांची सत्ता उलटवणाऱ्या “अरब स्प्रिंग’ आंदोलनानंतर सिसी यांनी देशाची सत्ता ताब्यात घेतली होती. इस्लामी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्यानंतर सिसी यांनी देशाचे अध्यक्षपद मिळवले आहे.

सिसी यांनी 2013 च्या निवडणूकीत मोर्सी यांची सत्ता उलथवून टाकली आणि पहिल्यांदा अध्यक्ष बनले. 2018 साली देशाच्या अध्यक्षपदी त्यांची फेरनिवड झाली. त्यावेळी त्यांना 97 टक्के मतदान झाल्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनविरोध झाली होती. सिसी यांच्या सरकारकडून दडपशाही केली जात असल्याची टीका आंतरराष्ट्रीय निरीक्षकांकडून केली जात आहे. या सार्वमतातून सिसी यांची एकाधिकारशाही वाढीस लागेल, असेही निरीक्षकांचे मत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.