नवी दिल्ली : देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक लाखाचाही पुढे गेली आहे. भारतात सध्या एकूण 1 लाख 1 हजार 139 रुग्ण आहेत. आतापर्यंत 3163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 2350 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 39,174 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.
देशात सध्या रिकव्हरी रेट 38.73 टक्के आहे. देशात एकूण 58802 सक्रिय रुग्ण (अॅक्टिव्ह) म्हणजे ज्यांचावर उपचार सुरू आहे. त्याच वेळी केवळ 2.9 टक्के कोरोनाबाधित रुग्णांना आयसीयूची आवश्यकता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
तर देशात दर एक लाख लोकसंख्येमागे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा जवळपास 8 व्यक्ती इतका आहे. त्यामुळे काही अंशी दिलासादायक बातमी असली, तरी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे