नगर -जिल्ह्यात आज 289 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 52 हजार 655 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.51 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 164 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 631 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 19, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 31 आणि अँटिजेन चाचणीत 114 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 8, नगर ग्रामीण 2, पारनेर 4, संगमनेर 1, श्रीगोंदा 4, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 7, कर्जत 1, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 1, नेवासे 1, राहाता 3, संगमनेर 11, शेवगाव 3, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 114 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 6, अकोले 9, जामखेड 5, कर्जत 5, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 13, नेवासे 5, पारनेर 9, पाथर्डी 11, राहाता 11, राहुरी 11, संगमनेर 13, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 8, अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज 289 रुग्णांना डिस्चार्ज
आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 66, अकोले 34, जामखेड 29, कर्जत 6, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 15, नेवासे 23, पारनेर 10, पाथर्डी 20, राहाता 24, राहुरी 6, संगमनेर 27, शेवगाव 5, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 15 आणि कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.