पुणे – आपल्यापैकी बरेचजण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याऐवजी थेट मेडिकल स्टोअरमध्ये जातात आणि काहीही विचार न करता त्या आजारासाठी औषधे खरेदी करतात. या औषधांमुळे लोक बरे होतात, परंतु काहीवेळा त्याचे गंभीर परिणाम देखील भोगावे लागतात. बर्याच औषधांच्या पानांवर लाल पट्टी बनविली गेली आहे. तुम्हाला या पट्टीचा अर्थ ठाऊक आहे का? जाणून घ्या, म्हणजे औषधे विकत घेताना यामुळे सावध राहता येईल.
या लाल पट्टीबद्दल डॉक्टरांना सविस्तर माहिती असते. परंतु सामान्य लोकांकडे याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नसते. अशा परिस्थितीत लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वैद्यकीय दुकानातून औषध खरेदी करतात आणि समस्येवर तोडगा काढण्याऐवजी समस्या वाढतेच. म्हणून, औषधे खरेदी करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
वास्तविक, औषधांच्या पानांवर लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ असा आहे की डॉक्टरांनी लिहून दिलेल्या सूचनाशिवाय औषध विकू शकत नाही किंवा वापरता येणार नाही. प्रतिजैविकांच्या चुकीच्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी, काही औषधांवर लाल रंगाची पट्टी आखली जाते.
लाल पट्टीशिवाय औषधांच्या मागील बाजूस इतरही अनेक उपयोगी गोष्टी लिहिल्या जातात, ज्याविषयी तुम्हालाही माहिती असणे आवश्यक आहे. काही औषधांवर आरएक्स लिहिलेले असते, याचा अर्थ असा आहे की हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
ज्या औषधांवर एनआरएक्स लिहिलेले असते, त्याचा अर्थ असा आहे की केवळ त्या डॉक्टरांनाच रुग्णास औषध देण्याची परवानगी आहे, ज्यांच्याकडे औषध परवाना आहे. काही औषधांमागे एक्सआरएक्स असे लिहिलेले असते. याचा अर्थ असा आहे की हे औषध फक्त डॉक्टरांकडूनच घेतले जाऊ शकते. डॉक्टर हे औषध थेट रुग्णाला देऊ शकतात. जरी रुग्णांकडे डॉक्टरांनी लिहिलेले प्रिस्क्रिप्शन असले तर रुग्ण कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून विकत घेऊ शकत नाही.