#CWC19 : आमच्या पराभवाचे कारण आयपीएल – फाफ डु प्लेसिस

लंडन – विश्‍वचषक स्पर्धेतून दहा संघांपैकी दोन संघांचे आव्हान संपुष्टात आले असुन त्यामध्ये महत्वाचा संघ समजला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. तर, दुसरा संघ आहे अफगाणिस्तानचा अफगाणिस्तान हा संघ नवोदीत आणि दुबळा असल्याने स्पर्धेबाहेर जाणे अपेक्षित होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेला देखील या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. आफ्रिका स्पर्धेतून बाहेर पडण्याचे आणि त्याच्या खराब कामगिरीचे खापर आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने आयपीएलवर फोडले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघातून खेळला होता. या संघातून खेळताना त्याने दिल्लीला अंतिम 4 संघांमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पण त्याची चांगली कामगिरी ही विश्‍वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या खराब कामगिरीसाठी कारणीभूत ठरली असल्याचे मत डु प्लेसिसने व्यक्त केले आहे.

रबाडाची कामगिरी चांगली का होऊ शकली नाही याचे नेमके उत्तर देणे कठीण आहे. पण आयपीएलमध्ये जाऊन खेळू नकोस असे त्याला आम्ही सांगितले होते. त्याने आयपीएल न खेळण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केले होते. त्याने आफ्रिकेतच रहावे आणि तंदुरुस्त राहून ताजेतवाने होऊन विश्‍वचषक स्पर्धेत उतरावे असे आम्हाला वाटत होते. पण तो स्पर्धेसाठी गेला. त्यानंतरही स्पर्धेच्या मध्यातून त्याने परत यावे. शरीराला आवश्‍यक तितके दिवस आराम करावा आणि त्यानंतर विश्‍वचषक स्पर्धा खेळावी, असे आमचे म्हणणे होते. पण त्याने आणि इतर अनेक खेळाडूंनी शरीरावर अतिरिक्त ताण देऊन संपूर्ण स्पर्धा खेळली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत त्याला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आली नाही. असे डु प्लेसिसने स्पष्टपणे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.