तालिबान्यांचा खरा चेहरा जगासमोर! काबुल एअरपोर्टवर मुलींचा जबरदस्तीने ‘निकाह’; जीव वाचवण्यासाठी मुली म्हणतायत ‘कबुल है’!

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येऊन आता १५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र सुरुवातीला जगाच्या रीतीप्रमाणे चालणार असल्याचे सांगणाऱ्या तालिबानचा खरा चेहरा जगासमोर येत आहे. कारण तालिबानच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अनेक तरुणींना काबुल विमानतळाबाहेर जबरदस्तीने लग्न करायला लागल्याची बाब एका रिपोर्टमधून समोर आली आहे.

एकट्या तरुणीला विमानतळावर जाण्यास मनाई तालिबानी कायद्यानुसार एकट्या तरुणींना विमानतळावर सोडले जात नव्हते. जर एखादी महिला कुटुंबासोबत देशाबाहेर जात असेल, तरच त्या महिलांना विमानतळाकडे जाऊ दिले जात होते. त्यामुळे देश सोडण्याची इच्छा असणाऱ्या हजारो महिलांना जबरदस्तीने लग्न करावे लागले.

अनेक महिलांनी पुरुषांना लग्नासाठी तयार केले. त्यांच्यासोबत लग्न केलं आणि आपण एकच कुटूंब आहोत, असे दाखवत देश सोडला. पैसे देऊन लग्न आपल्या मुलीला किंवा बहिणीला देश सोडणे शक्य व्हावं, यासाठी लग्न न झालेल्या आणि देश सोडण्याच्या तयारीत असलेल्या अनेक पुरुषांना या तरुणी आणि त्यांचे कुटुंबीय गाठत होते.

त्यांना लग्न करण्याची विनंती करत होते. अनेकांना तर लग्न करण्यासाठी पैसेदेखील दिले जात होते. काहीही करून तालिबानच्या तावडीतून सुटून बाहेर पडणं, हाच सर्वांचा उद्देश होता. युएईमार्गे युरोप अऩेक तरुणींना युरोपात जायचे होते. मात्र काबुलमधून थेट विमान नसल्याने त्यांनी अगोदर युएईत जाण्याचे ठरवले.  युएईमार्गे त्यांनी युरोपचा रस्ता धरला. यातील बहुतांश लग्नं ही काबुलपासून सुरु होऊन विमानाने उड्डाण घेताक्षणी संपली. मात्र या लग्नांनीच अनेक तरुणींचा जीव वाचला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.