दुबई – सलामीवीर फलंदाज देवदत्त पदिक्कल आणि एबी डी व्हिलियर्स यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने सनरायझर्स हैदराबाद संघासमोर विजयासाठी 164 धावांचे आव्हान ठेवले आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत बेंगळुरू संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं.
प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने 20 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात 163 धावा केल्या. बेंगळुरूकडून सलामीवीर देवदत्त पदिक्कलने 42 चेंडूत 8 चौकारासह सर्वाधिक 56 तर एबीडी व्हिलियर्सने आक्रमक खेळी करताना 30 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 51 धावा केल्या. अॅरोन फिंच 27 धावा तर कर्णधार विराट कोहली 13 चेडूंत 14 धावा काढून बाद झाला.
गोलंदाजीत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून थंगरसु नटराजन, विजय शंकर आणि अभिषेक वर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. बेंगळुरूच्या इतर दोन विकेट रनआऊटच्या स्वरूपात पडल्या. अुनभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने 4 षटकांत 25 धावा दिल्या मात्र, विकेट घेण्यात तो अयशस्वी ठरला.