नवी दिल्ली : यंदा भारतात कडाक्याची थंडी पडू शकते. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरममध्ये एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाळा ऑक्टोबरपर्यंत वाढू शकतो. यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीमुळे देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांना त्रास होऊ शकतो. यंदा प्रथम कडक उष्मा, त्यानंतर पावसाचा कहर यामुळे नागरिक हैराण झाले असताना आता हिवाळ्याबाबतही असाच दावा केला जात आहे. आयएमडीच्या मते, एल निनो सप्टेंबरमध्ये सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीपर्यंत यंदा कडाक्याची थंडी पडू शकते.
एल निना मुळे सामान्यतः तापमानात घट होते. त्यामुळे हिवाळ्यातही जास्त पाऊस पडतो. त्यामुळे हिवाळा अधिक लांब आणि तीव्र होतो. एल निनोमध्ये पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलत असतात. त्यामुळे समुद्राचा पृष्ठभाग हा थंड होतो. आयएमडीचा अंदाज आहे की, सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान एल निनो सक्रिय होण्याची शक्यता ६६ टक्के आहे. तर हिवाळ्यात त्याच्या टिकून राहण्याची शक्यता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या परिस्थितीमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. यंदा भारतात १५ ऑक्टोबरला मान्सून संपणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटी दक्षिण भारतात येणाऱ्या ईशान्य मान्सूनवरही याचा परिणाम होऊ शकतो.
१९९९ सारखेच हवामान
यंदा देशात मान्सूनने काही भागात कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर आला. ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाने हवामान तज्ज्ञांनाही हैराण केले होते. त्यामुळेच आता सप्टेंबरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबरच्या अखेरीसही पाऊस होऊ शकतो. ला निना अजून सुरू व्हायचे आहे, त्यामुळे परिस्थिती १९९९ सारखी होत आहे.
ऑक्टोबरपर्यंत पाऊस का पडणार?
आयआयटी मुंबईचे प्राध्यापक म्हणाले की, यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला, पण जूनमध्ये कमी पाऊस झाला. जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला. मध्य पूर्व भागात कमी पाऊस पडत आहे आणि आता जास्त पाऊस पडू शकतो. त्याचे कारण म्हणजे ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. पूर्व गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात कोरड्या विसंगतींचे एक हॉट स्पॉट राहिले आहे. हे समजणे खूप कठीण आहे. उत्तरेकडील प्रदेश आणि हिमालयाच्या पायथ्याशीही २३ टक्के कमी पाऊस झाला आहे.