#ICCWorldCup2019: पाऊस थांबला! मॅच लवकरच सुरु होण्याची शक्यता

नॉटिंगहॅम: सलग चौथा विजय नोंदविण्याच्या न्यूझीलंडच्या मार्गात पावसाचा अडथळा आला आहे. शतकवीर शिखर धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरूध्द सलामीच्या जोडीत के.एल.राहुल हा रोहित शर्मा कितपत साथ देईल याचीच चिंता भारतीय संघ व्यवस्थापनास निर्माण झाली आहे.

दरम्यान, ताज्या वृत्तानुसार नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिजवरील सामन्यात पावसाचं सावट सध्यातरी दूर झालं आहे. मात्र खेळपट्टी अजूनही झाकलेली आहे. सामना वेळेत सुरू होईल की नाही याबाबत साशंकता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियावरून ही माहिती दिलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.