नागरिकांतून समाधानाचे वातावरण
वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथे डोमखेल रोड, आनंदनगर, मयुरी सोसायटी, एसटी कॉलनी याठिकाणी सांडपाणी, रस्त्याचा प्रश्न दहा वर्षांपासून प्रलंबित होता. नागरिकांकडून रस्त्याच्या बाबतीत तसेच सांडपाण्याच्या प्रश्न सोडवण्याचा वारंवार पाठपुरावा केला जात होता.
माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे, महेंद्र भाडळे, पूजा समीर भाडळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्राम निधीद्वारे या भागातील नागरिकांचा सांडपाणी, मजबूत अंतर्गत रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे. आनंदनगर, मयुरी सोसायटी, एसटी कॉलनी, डोमखेल भागातील समस्यांची सोडवणूक झाली आहे. यापुढे हा भाग अधिक समस्यामुक्त करण्याचा ग्रामपंचायतीचा मानस असल्याचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भाडळे यांनी सांगितले. वाघोलीमधील वार्ड क्रमांक एकमधील गेल्या दहा वर्षांपासून प्रश्न सोडवल्यामुळे नागरिकांकडून ग्रामपंचायत व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.