त्या पोलीस ठाण्याचा प्रश्‍न अखेर मार्गी

आमदार अशोक पवार ः इमारत बांधकामासाठी 1 कोटी 73 लाखांचा निधी मंजूर

शिरूर (पुणे) – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शिरूर पोलीस स्टेशनचा प्रश्‍न अखेर मिटला. शिरूर पोलीस स्टेशन बांधकामासाठी जिल्हा नियोजन बैठकीत 1 कोटी 73 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती शिरूर-हवेली तालुक्‍याचे आमदार अशोक पवार यांनी दिली.

शिरूर तालुका व शिरूर शहरातील शिरूर पंचायत समिती, वन विभाग, ग्रामीण रुग्णालय व एकाच छताखाली सहा कार्यालय असणारी प्रशासकीय इमारत या शासकीय कार्यालयांचे जुन्या इमारतीतून नव्या व अत्याधुनिक इमारतीत रुपांतर करण्याचे श्रेय आमदार अशोक पवार यांना जात आहे. शिरूर शहरातील न्यायालय इमारतीसाठी 33 कोटी, तर आता शिरूर पोलीस स्टेशनसाठी जवळपास पावणेदोन कोटी निधी आणून आमदार अशोक पवार यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवण्यास पुन्हा एकदा सुरुवात केल्याचे चित्र शिरूर तालुक्‍यात दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा शिरुर पोलीस स्टेशनचा प्रश्‍नासाठी आमदार अशोक पवार 2009 ते 14 या काळात त्यांनी या कामाचा पाठपुरावा केला होता. आता पुन्हा त्यांच्याकडे आमदारकी आली आणि त्यांनी पुन्हा एकदा शिरूर पोलीस स्टेशनचा प्रश्‍न मार्गी लावला. त्यामुळे शिरूर पोलीस स्टेशन आता अध्यावत होणार आहे.

शिरूर शहरातील रस्त्यासाठी तसेच टपरी पुनर्वसनासाठी कोट्यावधीचा निधी आमदार अशोक पवार यांनी यावेळेस मंजूर केला असून तसेच शिरूर बसस्थानकाचे काम जोमात सुरू आहे. यामुळे शिरूर शहरातील शासकीय कार्यालय, गोरगरीब टपरीधारक, प्रवासी वाहतूकदार, पोलीस प्रशासन, शिरूर न्यायालय आवारातील नवीन इमारतीमध्ये आता रूपांतर होणार आहे.

शिरूर पोलीस स्टेशनचे इतर तालुक्‍यातील कार्यालयात प्रमाणेच अद्ययावत इमारत व्हावी, यासाठी गेल्या पंचवार्षिकमध्येही त्यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु पुन्हा आमदारकीची संधी मिळाल्याने शिरूर पोलीस स्टेशनची अद्ययावत इमारत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शिरूर पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी 1 कोटी 73 लाख 61 हजार रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर केला आहे.
– ऍड. अशोक पवार, आमदार शिरूर हवेली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.