सातारा – सातारा पोलीस वसाहतीला जाणार्या रस्त्याची दुरावस्था ‘प्रभात’ने गेली अनेक दिवस प्रशासनापुढे मांडली होती. त्यानंतर राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने हा प्रश्न सोडवण्याचे आदेश अधिकार्यांना दिले होते. मात्र, आज (शनिवारी) झालेल्या सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पोलीस वसाहतीच्या रस्त्याचा प्रश्न गाजला.
पोलिसांच्या नशिबी तुटक्या इमारती अन् खड्ड्यांचा रस्ता
भाजपा नगरसेविका सिध्दी पवार यांनी सभेत ‘प्रभात’च्या बातमीचा दाखला देत तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी आक्रमक मागणी केली. पवार यांनी रस्त्याचा मुद्दा मांडताच उपस्थित सदस्यांनी त्यास बाके वाजवून अनुमोदन दिले.