पंधरा प्रवासी जखमी
कानपुर – उत्तरप्रदेशात आज कानपुर-दिल्ली मार्गावर धावणारी पुर्वा एक्स्प्रेस गाडी रूळावरून घसरल्याने झालेल्या दुर्घटनेत पंधरा प्रवासी जखमी झाले. कानपुर पासून 20 किमी अंतरावरील रूमा रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला. मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमाराला हा प्रकारघडला. या एक्स्प्रेसचे तब्बल 12 डबे रूळावरून घसरले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या दुघटनेत एकूण 52 किरकोळ जखमींना जागेवरच प्रथमोपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे मात्र अन्य पंधरा जणांना रूग्णालयात नेण्यात आले आहे. या गाडीतील प्रवाशांना कानपुरला आणण्यात आले आणि नंतर त्यांची अन्य गाड्यांमधून दिल्लीकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली.