शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
पुणे – पावसाअभावी राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे चारा आणि पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडूनही गाईच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ दुधाची खरेदी 25 वरून 27 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजपासून खरेदी दर 2 रुपयांनी वाढविण्यात आल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालकडॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.
अमुलने राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता दूध खरेदी दरात वाढ करून ते 27 रुपये केले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी दराच्या दूध खरेदी दरात वाढ अपेक्षित होते. अमूलनंतर पुणे जिल्हा सहकारी दूध संघानेही दूध खरेदी दरात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
याबाबत डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, शासनाचा गाईच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ दुधाचा खरेदी दर 25 रुपये प्रतिलिटर आहे. त्यापेक्षा 2 रुपये जादा दर देऊन 21 जूनपासून दुधाची खरेदी 27 रुपये दराने सुरू करण्यात येणार आहे.