पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरातील अवैदय धंदे, अवैदय कारवाया यासोबतच शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे समुळ उच्याटन करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहोचून समाजाचा घटक असणारे दुर्बल, महिला, लहान मुले, वयोवृध्द यांच्या समस्या सोडविणे तसेच त्यांना बळ देऊन पोलीस खात्यासंदर्भात सर्वसामान्य नागरीकांचे मनात विश्वास निर्माण करणे या गोष्टींनाही महत्त्व दिले आहे. व त्यासंदर्भात आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिलेत.
दिनांक 4 मे 2021 रोजी 16.00 वा ते दिनांक 5 मे 2021 रोजी 16.00 वा पर्यंत मा. पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी ईन्स्टाग्रामव्दारे “Ask Me Anything” या उपक्रमा अंतर्गत नागरीकांशी थेट संपर्क साधून नागरिकांच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
सदर कार्यक्रमास तब्ब्ल 9786 नागरिकांचा अतिशय उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच 250 पेक्षा जास्त नागरिकांनी प्रश्न विचारून 7850 पेक्षा अधिक नागरिकांनी लाईक्स केले. नागरिकांनी पोलीस आयुक्तांना विविध विषयांवर प्रश्नांची विचारणा केली. नागरिकांचा उत्साह पाहून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील प्रत्येक प्रश्नांस मार्मिक व अचूक उत्तर देवून नागरिकांशी अतिशय उत्साहाने संवाद साधला. नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मुख्यत: SPO, सायबर फसवणुक व वाढती गुन्हेगारी, याचा समावेश होता. त्यातील काही महत्वाच्या 25 ते 30 प्रश्नांची उत्तरे मा. पोलीस आयुक्तांनी स्वत: नागरीकांना “Ask Me Anything” या उपक या उपक्रमा अंतर्गत दिली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अश्या प्रकारे नागरिकांच्या विविध प्रश्नांस दिलखुलास उत्तरे दिल्याने नागरिकांनी आभार प्रकट करून असे उपक्रम वारंवार घेतले जावेत अशी विनंती केली. तसेच पुणे शहर पोलीस करत असलेला कामाबाबत समाधान व्यक्त करुन कामाचे कौतुक केले.