पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग दि. 9 रोजी दोन तासांकरिता बंद राहणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळामध्ये ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडच्या वतीने ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात आहे. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किमी 50 /500 या ठिकाणी थांबण्यात येणार आहेत. हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाने (एनएच-4) वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलीसांच्या वतीने देण्यात आली. या कालावधीत वाहनचालक आणि प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.