“डिजिटल डायलेमा’ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन

नवी दिल्ली – भारत दौऱ्यावर आलेले ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर्स, आर्टस्‌ ऍण्ड सायन्स म्हणजेच ऑस्कर अकादमी संस्थेचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत “डिजिटल डायलेमा’ या पुस्तकाच्या हिंदी ई-आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध चित्रपट संकलक आणि अकादमीच्या गव्हर्नर कॅरोल लिटीलटन, एफसीएटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती मनमोहन सरीन, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी आदी उपस्थित होते.

“डिजिटल डायलेमा’ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीमुळे भारतातील हिंदी भाषिक चित्रपट निर्माते आणि इतर व्यक्तींपर्यंत हे पुस्तक पोचण्यास मदत होईल असे मत बेली यांनी यावेळी व्यक्त केले. बदलत्या तंत्रज्ञानामुळे चित्रपट संग्रहाच्या माध्यमात आज अनेक आव्हाने आहेत. त्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि चित्रपट संग्रहाचे नियोजन करण्यासाठी शास्त्रशुद्ध माहिती या पुस्तकातून मिळू शकेल असे त्यांनी सांगितले.

मिल्ट शेल्टन आणि अँडी माल्झ यांनी लिहिलेले हे पुस्तक अनेक भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. या पुस्तकाच्या हिंदी भाषांतरासाठी एनएफएआय म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट जतन संग्रहालयाने अकादमी सोबत सामंजस्य करार केला होता, त्यातूनच याची हिंदी आवृत्ती तयार झाली.

चलतचित्रपटांमध्ये चित्रपटांची कला आणि शास्त्र अद्ययावत करण्याच्या दिशेने अकादमी काम करत आहे. अलिकडेच आलेल्या अकादमीच्या अहवालात चित्रपट उद्योगात चित्रपट संग्रहालयासाठी तसेच महत्वाची डिजिटल आकडेवारी सहज उपलब्ध करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेण्याविषयी विचार मांडण्यात आला आहे.

अनेक वर्षांच्या संशोधनानंतर अकादमीच्या विज्ञान तंत्रज्ञान परिषदेने चित्रपटांच्या डिजिटल आवृत्तीचा संग्रह दीर्घ कालासाठी शक्‍य आहे याचा शोध लावला. चित्रपट विषयीची माहिती दीर्घ काळापर्यंत जतन करणे आणि ती भविष्यासाठीही उपलब्ध करुन देणे या संदर्भातल्या आव्हानांचा आणि उपाययोजनांचा उहापोह या ग्रंथात करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)