मसुद अझरच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांत फ्रान्स मांडणार प्रस्ताव 

नवी दिल्ली – पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसुद अझर याच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव फ्रान्सकडून संयुक्त राष्ट्रांपुढे (यूएन) मांडला जाणार आहे. जैशने जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात मागील गुरवारी भयंकर दहशतवादी हल्ला घडवला. त्यापार्श्‍वभूमीवर, फ्रान्सकडून येत्या दोन दिवसांत महत्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात येईल. त्या पाऊलामुळे दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर छी-थू होईल.

अझरचे नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकून त्याच्यावर निर्बंध घालण्याची मागणी भारताकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, पाकिस्तानचा पुळका असणाऱ्या चीनकडून अझरवरील कारवाईच्या मार्गात अडथळे आणले जात आहेत. दरम्यान, अझरच्या विरोधातील प्रस्तावाविषयी फ्रान्सच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.