राजेश खन्नाची कन्या आणि अक्षयकुमारची पत्नी ट्विकल खन्नाने अभिनयाला रामराम ठोकून लेखणी हातात घेतली आहे. विविध नियतकालिकेतून तिचे कॉलम नियमितपणे प्रसिद्ध होतात. अलीकडेच तिने एका रंजक चॅटची झलक शेअर केली आहे. यात ती एका चाहत्यांशी संवाद साधते. विशेष म्हणजे हे चॅट 25 वर्षे जुने आहे. 1990 च्या दशकात ट्विंकलने बॉबी देवल बरोबर बरसात चित्रपटातून मायानगरीत पाऊल ठेवले होते.
त्यामुळे ट्विंकल खन्ना एकदम प्रकाशझोतात आली. पुढे काही चित्रपट तिने केले, परंतु बॉक्स ऑफिसवर टिकू शकले नाही. डिंपलची मुलगी एवढीच तिची जमेची बाजू होती. कालांतराने अक्षयकुमारसमवेत तिचा विवाह झाला आणि ती पुन्हा लाइमलाइटमध्ये आली. अभिनय करण्यापेक्षा तिने लिखाणावर भर दिला आणि ती चाहत्यांशी जोडली गेली. एका लाइव्ह चॅटमध्ये तिला एका चाहत्याने विचारले की, दहा वर्षानंतर तुम्ही स्वत:ला कोठे पाहता? तेव्हा ती म्हणते, दहा वर्षांनंतर दोन मुले, माझा कुत्रा आणि पतीसमवेत बसलेली असेल.
ट्विंकलने हा चॅट शेअर करताना सेन्स ऑफ ह्यूमरचा वापर केला. त्यात म्हटले की, हा चॅट सुमारे 25 वर्षापूर्वीचा आहे. मी पहिला लाइव्ह चॅट चाहत्यांसाठी ट्रान्सस्क्रिप्ट करत आहे. आजही दोन दशकानंतर मी माझ्या दोन मुलांबरोबर, माझ्या पेटबरोबर आणि एवढेच नाही तर पतीबरोबर आहे, असे ती म्हणते. विशेष म्हणजे चाहत्याबरोबर चॅट करताना भविष्यात असे काही घडेलच अशी हमी देखील देऊ शकत नव्हते, असेही तिने नमूद केले आहे.