एल्गार परिषद प्रकरणी प्राध्यापकाच्या घराची झडती

हक्‍कासाठी लढणाऱ्यांना गप्प बसण्याचा डाव असल्याचा आरोप

नवी दिल्ली : एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांनी दिल्ली विद्यापीठातील एका प्राध्यापकाच्या नोएडा येथील निवासस्थानाची झडती घेतली. त्यांच्या घरातून काही पुस्तके जप्त केली. दरम्यान, हा हक्कासाठी लढणाऱ्यांना गहप्प करण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे.

“पोलिसांनी माझ्याकडील साहित्याचा शोध घेतला. साहित्य आणि इलेक्‍ट्रॉनिक गोष्टींचा शोध घ्यायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.त्यांनी प्रत्येक अन्‌ प्रत्येक पुस्तक तपासले. त्याच बरोबर कपाटांची कसून झडती घेतली. शांत असणाऱ्यांना किंवा हक्कासाठी लढणाऱ्यांना इशारा देणे हाच त्यांचा हेतू होता.” 
प्रा. हॅनी बाबू , नोएडा

हॅनी बाबू असे त्यांचे नाव असून त्यांना अद्याप अटक केली नाही. तसेच त्यांचे नाव आरोपींच्या यादीत समाविष्टही केले नाही. पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी बाबू यांच्या निवासस्थानी पोहोचले.त्यांनी दुपारपर्यंत शोधमोहिम राबविली. तेथून काही पुस्तके जप्त केली.

या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनी या कारवाईला दुजोरा दिला. बाबू यांचे या प्रकरणातील आरोपींसोबतचे संबंध तपासून पाहण्यात येत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. बाबू हे राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या समितीशी संबंधित आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.