देशातील रेमडेसिविरचे उत्पादन तीन पट वाढले

नवी दिल्ली – देशात रेमडेसिविर औषधाचे उत्पादन जलदगतीने वाढविले जात आहे. केवळ काही दिवसांच्या कालावधीत देशाने रेमडेसिविरचे उत्पादन तिप्पट करण्यात यश मिळविले आहे आणि लवकरच या औषधाची वाढती मागणी पूर्ण करण्यात देशाला यश मिळेल, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे दिली.

12 एप्रिल रोजी देशात रेमडेसिविरच्या 37 लाख कुप्यांचे उत्पादन झाले होते. त्यात तिप्पट वाढ होऊन आज 4 मे ला रेमडेसिविरच्या 1 कोटी 5 लाख कुप्या उत्पादित करण्यात आल्या.

रेमडेसिविर औषधाची वाढती मागणी लक्षात घेऊन, या औषधाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. 20 एप्रिल 2021 रोजी देशात रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या 20 कंपन्या कार्यरत होत्या, त्यात वाढ होऊन आज 4 मे 2021 ला एकूण 57 कंपन्या रेमडेसिविरची निर्मिती करीत आहेत, असे मांडवीय यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.