केर्नची भारताविरुद्ध खटले परत देण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली – केर्न कंपनीने एअर इंडिया विरुद्ध न्यूयॉर्क न्यायालयात खटला दाखल केला होता. आता या खटल्याच्या कामकाजावर स्थगिती आणावी अशी विनंती केर्न कंपनीबरोबरच इंडिया कंपनीने केली आहे.

भारत सरकारने केर्न कंपनीकडून पूर्वलक्षी प्रभावाने कर वसूल केला होता. याविरोधात केर्न कंपनीने जागतिक लवादात खटला दाखल केला होता. लवादाने केर्न कंपनीच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर लवादाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी केर्न कंपनीने जगातील विविध न्यायालयात खटले दाखल केले होते.

भारत सरकारच्या मालकीच्या असलेल्या एआर इंडियाची मालमत्ता विकून ही रक्कम आपल्याला परत मिळावी अशी याचिका केर्न कंपनीने न्यूयॉर्क न्यायालयात दाखल केली होती. दरम्यानच्या काळात भारत सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने कर वसूल करण्याची पद्धत बंद केली आहे. त्याचबरोबर वसूल केलेला कर परत करणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे कर्न कंपनी भारत सरकारविरुद्धचे खटले परत घेत आहे. त्याचाच भाग म्हणून न्यूयॉर्क न्यायालयात एअर इंडिया कंपनीविरोधात दाखल केलेला खटला स्थगित करावा केर्न असे कंपनीने म्हटले आहे. त्याचबरोबर एअर इंडिया कंपनीने हा खटला स्थगित करावा अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.