बनावट प्रमाणपत्र प्रकरणी अमित जोगींना अटक
नवी दिल्ली : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र माजी आमदार अमित जोगी यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण, मंगळवारी सकाळी अमित जोगी यांना त्यांच्या बिलासपूर येथील निवासस्थानावरून पोलिसांनी अटक केली आहे. निवडणुकीच्या वेळी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांना ही अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Chhattisgarh: Police arrests Amit Jogi, son of former Chhattisgarh Chief Minister Ajit Jogi, from his residence in Bilaspur. More details awaited. pic.twitter.com/5e26dyDlBr
— ANI (@ANI) September 3, 2019
बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सोमवारी बिलासपूर जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्षा आणि भाजपा नेत्या समीरा पैकरा आणि मरवाही गावच्या आदिवासींनी अमित जोगींच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती. दरम्यान, 3 फेब्रुवारी रोजी मरवाहीचे माजी आमदार अमित जोगी यांच्याविरोधात गौरेला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मरवाही विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार राहिलेल्या समीरा पैकरा यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार अमित जोगी यांच्या जन्मतारखेत 1 वर्षाचा फरक दिसत आहे. त्याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.