पंतप्रधानांचे ‘हे’ ट्विट ठरले यंदाचे ‘गोल्डन ट्‌वीट’

नवी दिल्ली : सोशलमीडियावर सतत अपडेट असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याठिकाणीदेखील आपली बाजी मारली आहे. कारण त्यांचे या वर्षातील एक ट्‌विट हे गोल्डन ट्‌विट म्हणून प्रसिद्ध झाले आहे. 2019 हे वर्ष ‘लोकसभा इलेक्‍शन 2019’ या हॅशटॅगने गाजवले, तर सर्वाधिक लोक्रप्रिय 10 व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अव्वल स्थान पटकावले.

लोकसभा निवडणूक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘सबका साथ+ सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ हे ट्‌वीट या वर्षाचे गोल्डन ट्‌वीट ठरले आहे. या ट्‌वीटला एक लाख 17 हजार 100 रीट्‌वीट, तर तब्बल चार लाख 20 हजार लाइक्‍स मिळाले.

क्रीडा विभागात विराट कोहली याने महेंद्र सिंग धोनीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ट्‌वीट सर्वाधिक रीट्‌वीट झाले, तर मनोरंजन क्षेत्रात पुन्हा एकदा टॉलिवूडनं आपले अव्वल स्थान कायम ठेवलं. विजय या अभिनेत्यानं ‘बिगिल’ या चित्रपटाबाबत कलेलं ट्‌वीट सर्वाधिक रीट्‌वीट झालं.

विराट कोहलीच्या व्‌टिला 45 हजार 100 रीव्‌टि आणि चार लाख 12 हजार लाइक्‍स मिळाले. ‘लोकसभा निवडणूक’ आणि ‘चांद्रयान 2’सारखे हॅशटॅग वर्षभरात ट्रेंडिंग राहिले, तर ‘पुलवामा’, ‘आर्टीकल 370’ हे विषयही ट्रेंडिंग राहिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.