नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले कि, पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विरोधी पक्षनेत्यांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधानांच्या संभाषणात लोकसभा किंवा राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील सभागृह नेते यामध्ये सहभागी होतील. त्यात अशा पक्षांचा समावेश आहे, ज्यांचे दोन्ही सभागृहात सदस्यांची संख्या कमीतकमी 5 किंवा त्याहून अधिक आहे.
देशात लाकडाऊनच्या पार्शवभूमीवर पंतप्रधान जनतेशी सवांद साधत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभामीवर पंतप्रधान 8 एप्रिल रोजी ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील, आणि त्यांचे मत जाणून घेतील.