‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार; पालक पहिल्यांदाच होणार सहभागी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा 2021’ हा कार्यक्रम आज सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. परीक्षा पे चर्चा कार्यकमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असे एकूण 14 लाख व्यक्ती या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोटो शेअर करत परीक्षा तणावमुक्त करुया, असे म्हटले आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे चौथे पर्व ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रम प्रसारभारतीच्या 32 वाहिन्यांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रक्षेपित होणार आहे.

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम स्वयंप्रभा, दुरदर्शनसह प्रसारभारतीच्या 32 वाहिन्यांवर प्रसारित होईल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय शिक्षणमंत्रालयाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन परीक्षा पे चर्चा प्रसारित होईल. पीआयबी आणि नरेंद्र मोदी यांच्या सांयकाळी 7 वाजता युट्युब, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कार्यक्रमाचं प्रसारण केले जाईल.

परीक्षा पे चर्चा 2021 स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी, शिक्षक आणि पालक पंतप्रधान नरेंदर् मोदींना प्रश्न विचारु शकणार आहेत. विजेत्यांना नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असलेले स्मृतीचिन्ह 1500 विद्यार्थी, 250 पालक आणि 250 शिक्षक यांना देण्यात येणार आहे.परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं पहिल्या ऑनलाईन पर्वातील चर्चेसाठी उत्सुक असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा होईल. यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी निश्चित काहीतरी असेल, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदींनी त्यासोबत एक फोटो देखील शेअर केला आहे.

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात. यंदा विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी 2.62 लाखांहून अधिक शिक्षकांनी, 10.39 लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील नोंदणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.