पंतप्रधान, मुख्यमंत्री ‘या’ टप्प्यात घेणार करोना लस

नवी दिल्ली – करोनावरील प्रतिबंधात्मक लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरात लसीकरणास सुरुवात झाली आहे. आता टप्प्याटप्प्याने सर्वांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नेते मंडळींना लस कधी दिली जाणार? असा प्रश्न सर्वानांच पडला होता. तर  या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. पहिला टप्पा एप्रिलमध्ये संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील ७५ टक्के खासदारांना करोना लस देण्यात येणार आहे. याच टप्प्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लस दिली जाईल. 

उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांना प्राथमिकता देण्यात येणार असल्याचेही माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. मात्र, लसीकरणाचा दुसरा टप्प कधी सुरु होईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही

दरम्यान, आरोग्यसेवा देणारे कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स अर्थात पोलीस, महानगरपालिका कर्मचारी यांच्यानंतर लसीकरण होणारी दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील असेल. त्यानंतरच्या ५० वर्षांखालील लोक असण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.