जेरूसलेम – इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानयाहू यांना क्वारंटाईन अवस्थेत राहण्याची सुचना त्यांच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. त्यांच्या कार्यालयातील एक अधिकारी करोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर तातडीने पंतप्रधानांनाही क्वारंटाईन राहण्याची सुचना करण्यात आली आहे.
तथापी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना या विषाणुंची बाधा झाली नसल्याचे आढळून आले असले तरी दक्षतेची उपाय योजना म्हणून त्यांना क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे. इस्त्रायलमध्येही करोनाचे अनेक रूग्ण आढळून आल्यानंतर संपुर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे.
ब्रिटीश पंतप्रधानांना करोना झाल्यानंतर थेट एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनाच या रोगाच्या संशयाने क्वारंटाईन राहण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. दरम्यान इस्त्रायल मध्ये करोना झालेल्या रूग्णांची संख्या 4347 इतकी झाली आहे. त्या देशात आत्तापर्यंत करोनामुळे 16 रूग्ण दगावले आहेत.