पंतप्रधानपद हा माझा अजेंडा नाही – नितीन गडकरी 

भोपाळ – लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजप पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करत करत आहे. तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष मोदी सरकार हटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशामध्येच पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी चर्चेत आले आहे. एका प्रचार कार्यक्रमादरम्यान गडकरी यांना तुम्ही पंतप्रधानपदाचे दावेदार आहात का? असा प्रश्न विचारला.

गडकरी म्हणाले की, मी याआधीदेखील अनेकदा स्पष्ट केले आहे, पंतप्रधानपद हा माझा अजेंडा नाही. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच या पदाचे उमेदवार आहेत आणि यावेळीदेखील तेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. भारतीय जनता पक्षाने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा जिंकल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा यावेळी जिंकेल. महामार्ग, जलमार्ग, कृषी क्षेत्रासह केंद्र सरकारने विविध क्षेत्रात खूप कामं केली आहेत. त्यामुळे विकास हा आमच्या पक्षाचा निवडणुकीचा अजेंडा आहे. त्याच्या जोरावर आम्ही निवडणूक लढत आहोत. देशाला सुपर इकोनॉमिक पॉवर बनवण्यासाठी आम्ही कामं करत आहोत. मोदींच्या नेतृत्वाने देशाला दिशा दिली आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.