पुणे : मार्केट यार्ड येथील फूल बाजारात रविवारी (दि. ८) सुट्ट्या फुलांच्या मागणीसह भावातही घट झाली आहे. लग्नसराईमुळे शोभिवंत फुलांना मागणी वाढली आहे; परंतु आवक मोठ्या प्रमाणात असल्याने शोभिवंत फुलांच्याही भावात घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्गशीर्ष महिना सुरू आहे. त्यामुळे फुलांना भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, आवक वाढल्याने तसे होताना दिसत नाही.