मुंबई – अमेरिकेचे अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून बिटकॉइनच्या मूल्यात एकतर्फी वाढ होत आहे. आज बिटकॉइनचा दर वाढून 89 हजार डॉलरवर पोहोचला.
दरम्यान बिटकॉइनचे दर वाढत असतानाच सोने चांदी आणि इतर वित्तीय उत्पादनात गुंतवणूक कमी होत आहे. यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. बिटकॉईनला डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. त्यांचे पुत्र या क्षेत्रात कार्यरत आहेत. आगामी काळामध्ये बिटकॉइनसाठी आवश्यक नियंत्रण व्यवस्था उपलब्ध करण्याचा संकल्प ट्रंप यांनी केला आहे.